यावल येथील भव्य मोफत आरोग्य मेळावा संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत ग्रामीण रुग्णालय यावल येथे भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सामाजीक कार्यकर्त डॉ.कुंदन फेगडे हे होते. आरोग्य मेळाव्याचे तालुका स्तरावर आयोजन करण्यात आलेले असून, मेळाव्यात मोफत आरोग्य विषयक जनजागृती तपासणी, उपचार तसेच लाभार्थ्यांचे “युनिक हेल्थकार्ड आयडी” तयार करण्यात येऊन वितरण करण्यात आले. यावेळी सदर आरोग्य मेळाव्याच्या सर्व विभागात फिरून संबंधित आरोग्य कर्मचारी यांचे कडून सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली व जास्तीत जास्त नागरिकांनी सदर मोफत आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी डॉ. कुंदन फेगडे यांनी गरजू रुग्णांना केले.

यावेळी डॉ. कुंदन फेगडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, यावल वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके, यावल वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. बी. बारेला, डॉ. निलेश दुसाने, डॉ. दिलीप भटकर, डॉ. धिरज चौधरी, डॉ. प्रशांत जावळे, डॉ. गौरव धांडे, डॉ. स्नेहल जावळे , डॉ. निलेश गडे, मनसेचे चेतन अढळकर, डॉ. गौरव भोईटे, डॉ. वैशाली निकुंभ , डॉ. अभिषेक ठाकूर,  डॉ. गफूर तडवी , डॉ. वायकोळे डॉ अलिफ पटेल, डॉ. आशपाक, डॉ. शबाना तडवी, डॉ. प्रवीण तडवी, डॉ. अमीन तडवी, डॉ. कमलेश पाटील, डॉ. मयूर चौधरी, डॉ. माधुरी गुंजाळ, यावल तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी, यावल ग्रामीण रुग्णालयाचे नानासाहेब घोडके, श्रीनिवास सोनवणे, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख, आरोग्य सेविका, आशाताई व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

 

Protected Content