बसस्थानक आवारातून महिलेच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र लांबविले

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारातून एका प्रवासी महिलेच्या गळ्यातून १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना २१ जून रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेखा शरद सोनवणे वय-४५, रा. चांगदेवनगर, जामनेर या महिला कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात २१ जून रोजी सायंकाळी ७ वाजता आल्या होत्या. दरम्यान जळगाव शहरातील नवीन बसस्थानक आवारात आलेल्या असताना त्यांच्या गळ्यातून १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर महिलेने सर्वत्र शोधाशोध केली. परंतु काहीही माहिती मिळाली नाही. अखेर रविवारी २३ जून रोजी दुपारी अडीच वाजता महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे या करीत आहे.

Protected Content