Home क्राईम प्रवासी रिक्षातून वृद्ध महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबवली

प्रवासी रिक्षातून वृद्ध महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबवली

0
131

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव रेल्वे स्टेशन बाहेरून बस स्टँडकडे रिक्षाने प्रवास करत असताना दोन अज्ञात महिला चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दोन पोती हातचलाखीने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत एकूण ९८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले आहेत. या प्रकरणी शनिवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, प्रभावती चुडामन वडीलकर (वय ५९, रा. न्यू पार्वती काळे नगर, जळगाव) या घटना ६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टॉप ते बस स्टँड येथे रिक्षा (क्र. MH १९, CW ३७७१) मध्ये बसल्या होत्या. त्याच रिक्षात त्यांच्यासोबत इतर दोन अज्ञात महिला प्रवासी देखील बसल्या होत्या.

बस स्टँडजवळ उतरल्यानंतर त्या दोन महिला तेथून निघून गेल्या. त्यानंतर घरी गेल्यावर सौ. वडीलकर यांच्या लक्षात आले की, त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.

दोन अज्ञात महिला चोरट्यांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने हे सोन्याचे दागिने चोरले. याप्रकरणी अज्ञात महिला आरोपींविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोहेकॉ सतिष पाटील करत आहे.


Protected Content

Play sound