जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून जळगाव तालुक्यातील भागपूर जगन पावरी यांच्याशेतात तरूणाला काचेची बाटली मारून दुखापत केल्याची घटना गुरूवार ९ मे रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सुनिल कैलास गायकवाड रा. भागपूर ता. जळगाव हा तरूण कुटुंबासह वास्तव्याला आहे. सुनिल हा गुरूवार ९ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जगन पावरी यांच्या शेतात असतांना त्याठिकाणी गावात राहणार अजय अरूण गायकवाड हा सुनिलजवळ आला. अजयने दारू पिण्यासाठी पैसे असे सुनिल सांगितले. माझ्याकडे पैसे नाही असे सुनिलने सांगितले. याचा राग आल्याने अजय याने बर्फाच्या गाडीवर असलेली काचेची बाटली सुनिलच्या डोक्यात टाकली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री ९ वाजता सुनिल गायकवाड याने तालुका पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा अजय अरूण गायकवाड रा. भागपूर ता.जि.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील हे करीत आहे.