Home क्राईम शिरपुरात प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला जळगावात अटक

शिरपुरात प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला जळगावात अटक



जळगाव (प्रतिनिधी) शिरपूर येथील तरुणीचा २३ मार्च रोजी विवाह झाल्यानंतर २५ रोजी आमोदा परिसरातील एका लॉजमध्ये तिची प्रियकराने हत्त्या केली होती. घटनेनंतर पळ काढलेला संशयीत आरोपी नरेंद्र भदाणे याला शनीपेठ पोलिसांनी काशिनाथनगरातून ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शिरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

शिरपूर तालुक्यातील जातोडा येथील रहिवासी रेणुका धनगर या तरुणीचा विवाह दुसऱ्या तरुणाशी झाल्याने प्रियकर नरेंद्र उर्फ पप्पू भदाणे याने तिचा खून केला होता. घटनेनंतर पप्पू याने दुचाकी क्रमांक एमएच.१८.एएम.८७८९ सह घटनास्थळावरून पळ काढला होता. संशयीत जळगावात आल्याची माहिती मिळाल्याने बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या पथकातील हकीम शेख, गिरीश पाटील, अनिल धांडे, योगेश बोरसे, अखलाख शेख यांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला शिरपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound