नगर (वृत्तसंस्था) ‘सीएम गो बॅक’च्या घोषणा देत एका तरुणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाईचा फुगा फेकल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यानिमित्त आज नगरमधील अकोले येथे हा प्रकार घडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारी नगरमधून सुरू झाली. त्याचदरम्यान शर्मिला येवले या तरुणीचा उद्रेक झाला. तिने ‘सीएम गो बॅक’, पिचड यांना उमेदवारी देऊ नका… महापोर्टल त्वरित बंद करा… महिलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष द्या, अशी मागण्या शर्मिला येवले हिने केल्या. तिने फेकलेली शाई रोडवर पडलेली दिसत होती. धक्कादायक म्हणजे शर्मिला गाड्याच्या ताफ्याच्या विरुद्ध दिशेला धावत सुटल्याची माहिती समोर आहे. शर्मिला येवले स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ता असल्याचे समजते.