उधारीच्या दहा रूपयासाठी मित्रानेच मित्रावर केला जीवघेणा हल्ला

भंडारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अवघ्या दहा रूपयांच्या उधारीवर घेतलेल्या पैशाच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार भंडारा शहरात घडला आहे. हा धक्कादायक प्रकार १८ मे रोजी सायंकाळी भंडारा शहरातील गांधी चौकात घडला. सचिन रंगारी असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, सचिन आणि त्यांचा मित्र हे शहरातील गांधी चौकात उभे होते. उधारीवर घेतलेल्या पैशातून दोघांमध्ये वाद झाला आणि वाद इतका वाढला की सचिन त्यांच्या मित्राने धारदार शस्त्राने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यानंतर मारेकरी फरार झाला. मात्र सुदैवाने सचिनचा जीव वाचला. सध्या भंडारा पोलिस मारेकरीचा शोध घेत आहे. हल्लेखोर फरार आरोपीच्या विरोधात भंडारा पोलीसात कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल घडलेल्या या घटनेने भंडारा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content