लालमाती वनहद्दीतील नर्सरीला आग ; मौल्यवान वनसंपदा खाक

 

pal fire1

 

पाल ता. रावेर (वार्ताहर) येथून जवळच असलेल्या लालमाती राखीव वनहद्दीतील नर्सरीमध्ये रविवारी दुपारी सुमारास अचानक आग लागल्याने सुमारे 15 एकर क्षेत्रातील मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, दि 20 रोजी लालमाती वनहद्दीतील कंपार्ट नं 16 मध्ये काम आटपून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विश्रांतीसाठी वनधिकारी व कर्मचारी घरी गेले होते. याचवेळी नेमकी अचानक नर्सरीमध्ये आग लागत तिचे वणव्यात परिवर्तन झाले. या घटनेची माहिती मिळताच वनपाल भदाणे व वनरक्षक सूर्यवंशी याना मिळताच, त्यांनी तात्काळ पाल मोरव्हाल, लोहारा,लालमाती येथील वनमजुर व ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही नर्सरी राखीव असल्याने तिथं कोरडे गवत व पालापाचोळा अधिक होता. त्यामुळे थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. साधारण दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. गेल्यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत या नर्सरीत रोपं लावण्यात आली होती. यातील बहुतांश रोपं जळून खाक झाली आहेत. वनपाल भदाणे, वनरक्षक सूर्यवंशी, वनमजुर जगन पवार,न्याजुद्दीन तडवी, दगडू तडवी, उखर्डू तडवी, इस्माईल तडवी, फीरोज तडवी व पाल, लोहारा,लालमाती येथील वनमजुरांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. तर आग लावणाऱ्याचा शोध वनविभाग घेत आहे.

 

 

Add Comment

Protected Content