जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळगाव खुर्द आणि नशिराबाद शिवारात महावितरण कंपनीच्या तार तुटून पडल्याने झालेल्या शार्टसर्कीटमुळे दोन शेतातील तोडणीला आलेला उस पुर्णपणे जळून खाक झाला आहे. यात दोन शेतकऱ्यांचे एकुण १३ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात वेगवेगळे घटनेच्या आगीची नोंद करण्यात आली.
नाशिराबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द शिवारात हरीष भागवत पाटील (वय-४१) रा. जळगाव खुर्द ता.जि.जळगाव यांचे जळगाव खूर्द शिवाराती ओरीएन्ट फॅक्टारी समोरील गट क्रमांक १४६ मध्ये शेत आहे. गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरण कंपनी इलेक्ट्रीक तार तुटल्याने झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे शेतातील कापणीला आलेला उसाला आग लागली. यात हरीष पाटील यांच्या शेतातील पाच एकर शेतातील ५ लाख रूपये किंमतीचा उस पुर्ण पणे जळून खाक झाला. तर दुसऱ्या घटनेत गिरीष अरूण महाजन (वय-३९) रा. नशिराबाद ता.जि.जळगाव यांचे नशिराबाद शिवारात गट क्रमांक २२१ शेत आहे. त्यांनी देखील शेतात उस लावलेला होता. त्यांच्या शेतातील उसाला देखील गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता सुमारास इलेक्ट्रीक तार तुटल्याने तोडणीला आलेला उस जळून खाक झाला आहे. यात त्यांचे ८ लाखाचे नुकसान झाले आहे. दोन्ही घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात सायंकाळी वेगवेगळे घटनेच्या आगीची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण ढाके व सहाय्यक फौजदार संजय जाधव करीत आहे.