शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे यांच्या संयुक्त पथकाने कोरोना दिशानिर्देश व नियमावली झुगारून दुकानात गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून १० हजारांचा दंड उसूल केला आहे.
शेंदूर्णी मधील न्यू वर्धमान ड्रेसेसचे संचालक सुनील जैन तसेच राजपूत इलेक्ट्रॉनिकचे संचालक किसन राजपूत यांच्यावर कोरोना नियमांचे प्रतिबंध उल्लंघन करून गर्दी जमावल्या प्रकरणी नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी प्रत्येकी ५ हजार प्रमाणे एकूण १० हजार रुपये दंडाची वसुली केली असून यापुढे जिल्हाधिकारी जळगाव यांनी जाहीर केलेल्या कोरोना १९ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबी दिली आहे. दरम्यान, येथील साईदीप क्लॉथ स्टोअर्स संचालक अर्जुन कोंदवणी यांनी समज देताच दुकान बंद केल्याने कारवाई टळली यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे स्थानिक पोलीस कर्मचारी व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.