जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पैसे न दिल्याच्या रागातून एका तरूणाला फायटरने बेदम मारहाण करून तोंडातील दोन पाडून दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना कानळदा रोड येथे गुरूवारी १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सैय्यद आसिफ सैय्यद नूर वय ३० रा.कानळदा रोड, शिवाजी नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. गुरूवाी १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता सैय्यद आसिफ कडे त्यांचा ओळखीचा तनवीर उर्फ तन्या शेख रा. गेंदालाल मिल जळगाव हा आला. त्याने पैसे मागितले. त्यावेळी आसीफने पैसे दिले नाही या रागातून तनवीर याने हातातील फायटरने तोंडावर, डोक्यावर पाठीवर मारहाण केली. यात आसीफच्या तोंडातील दोन दात पडून दुखापत झाली. त्यामुळे त्याच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार तनवीर उर्फ तन्या शेख रा. गेंदालाल मिल जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील हे करीत आहे.




