फायटरसह लाथाबुक्क्यांनी तरूणाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इंदिरा कन्या शाळेजवळ उभा असताना काहीही कारण नसताना तीन जणांनी येऊन तरुणाला लोखंडी फायटर हे डोक्यावर मारहाण करून दुखापत केली तर इतरांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी ५ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता घडली आहे. या संदर्भात १० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हरीश ज्ञानेश्वर पाटील वय-२२, रा. लहान माळीवाडा धरणगाव, हा तरुण शनिवारी ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता धरणगाव शहरातील इंदिरा कन्या शाळेजवळ उभा असताना त्या ठिकाणी राज पचेरवार, रोहित चौधरी आणि बाळा धनगर तिघे राहणार धरणगाव या तिघांनी काही कारण नसताना हरीश पाटील याला लोखंडी फायटरने बेदम मारहाण करून दुखापत केली तर यातील रोहित चौधरी यांनी बाळा धनगर यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दुखापत करत धमकी दिली. या मारहाणीत जखमी झालेल्या हरीश पाटील याला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरुवारी १० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता हरीश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राज पचेरवार रोहित चौधरी आणि बाळा धनगर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहे.

Protected Content