मोहराळा येथून शेतकऱ्याची मोटरसायकल लांबविली

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील मोहराळा येथील एका शेतकऱ्याची घरासमोर लावलेली हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना समोर आली असून या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलीस सुत्रांकड्डन मिळालेली माहिती अशी की, यावल पोलीस ठाण्यात लहू रामभाऊ पाटील वय४८वर्ष राहणार मोहराळा तालुका यावल यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे की दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी ४ वाजे तर दिनांक १०सप्टेंबर वेळ सकाळच्या ८ वाजेपर्यंत या कालावधी दरम्यान आपल्या घरासमोर लावलेली एमएच १९ बिए१९३२ही हिरो होंडा स्पेंडर कंपनीची सुमारे २५ ते ३० हजार रुपये किमतीची मोटरसायकल कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने घेऊन गेली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेन्द्र पवार हे करीत आहे .

 

Protected Content