मराठा आंदोलक रमेश केरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली फडणवीसांची भेट

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रमेश केरे यांचे शिष्टमंडळ सागर बंगल्यावर दाखल झाले आहे. गिरगावमधून पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली. बैठकीनंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील म्हणाले की, आम्ही नेहमीच जरांगेंच्या सोबत आहोत आणि राहणार, फडणवीसांची भूमिका ते माध्यमांसमोर मांडणार अशी चर्चा बैठकीत झाली.

दरम्यान रमेश केरे म्हणाले की, मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ही मागणी केली आहे. आमची काही वेगळी मागणी नाही. मराठा क्रांती ठोक मोर्च्यांने नेहमीच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. आणि येणाऱ्या काळातही आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत.

रमेश केरे म्हणाले की, सर्व पक्षांनी एकत्र येत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, ही आमची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सांगितले आहे की मी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका जाहीर करणार आहे. गेल्या काही काळापासून राज्यात मराठा आरक्षणावरुन विविध आंदोलने सुरू आहेत. आता याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर धडकणार असे म्हणत गिरगावमध्ये दाखल झाले होते.

Protected Content