भाजप नेत्याने केली पाकिस्तानी गाण्याची नक्कल

WzSWJMMPtRn3ujTo

 

हैद्राबाद (वृत्तसंस्था) तेलंगणाचे भाजप आमदार ठाकूर राजा सिंह लोध यांनी निवडणूक प्रचारासाठी चक्क पाकिस्तान सैन्याचे गाणं कॉपी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पाकिस्तान सैन्याने ट्विटरच्या आमदार ठाकूर यांना माध्यमातून त्यांना लक्ष्य केले आहे. गोशमलचे आमदार ठाकूर राजा सिंह लोध यांनी भारतीय सैन्याचा गौरव करण्यासाठी हे गाणे तयार केले आहे.

 

या गाण्याचा छोटासा अंश त्यांनी सोशल मीडियावर शेअर करताच पाकिस्तानी सैन्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. लोध यांनी ‘जिंदाबाद हिंदुस्तान’, ‘जिंदाबाद पाकिस्तान’ या पाकिस्तानी गाण्याची नक्कल केली असल्याचा पाकिस्तानी सैन्याचा आरोप आहे. २३ मार्चला पाकिस्तान दिनानिमित्त पाक माध्यमांनी हे गाणं प्रदर्शित केले होते. या गाण्यात पाकिस्तानी सैन्याचा गौरव करण्यात आला आहे. दरम्यान, मी कधीच कोणाची नक्कल केली नाही असे राजा सिंह लोध यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Add Comment

Protected Content