जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीराम पेठ येथील शिवम कलेक्शन रेडिमेड कपड्याच्या गोडाऊन मधून ७ लाख २२ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत सोमवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल किसन बजाज (वय-३३) रा. सिंधी कॉलनी, भुसावळ यांचे जळगाव शहरातील बळीराम पेठेत शिवम कलेक्शन रेडीमेड नावाचे कपड्याचे दुकान आहे व तिथेच कपड्याचे गोडावून देखील आहेत. ७ ऑक्टोबर रोजीच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांचे ओळखीचे लक्की गिडवाणी, आकाश फब्यानी आणि अन्वर मेमन तिघे रा. भुसावळ यांनी विशाल बजाज यांना कोणताही माहिती न सांगता त्यांच्या बळीराम पेठ येथील कपड्याच्या गोडाऊन मधून टी-शर्ट व शर्ट चे बॉक्स असा एकूण ७ लाख २२ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल वेळोवेळी तोडून चोरून नेला आहे. गोडाऊनचे कॅमेऱ्याची मेमरी कार्ड तोडून बंद करून ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विशाल बजाज यांनी सोमवार १० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी लक्की गिडवाणी, आकाश फब्यानी आणि अन्वर मेमन यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.