जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।जळगाव शहरातील अयोध्या नगरात बंद घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत १ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या प्रकरणी शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविराज राजेंद्र निकम (वय-३५) रा. सद्गुरु नगर जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने ते १ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता घर बंद करून बाहेर गेले होते. दरम्यान घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात ठेवलेले सोन्याची पोत, कलर टीव्ही, होम थेटर, दोन सुटकेसा असा एकूण १ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार ६ सप्टेंबर रोजी साडेसात रात्री साडेदहा वाजता समोर आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी रविराज निकम यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.