यावल प्रतिनिधी | शहराच्या बाहेरील क्षेत्रातील भुसावल नाका ते बोरवल गेटपर्यंत आगळी वेगळी एकदिवसीय स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावल शहराला लागून असलेले भुसावल नाका ते बोरावल गेटपर्यंतच्या रस्त्यावर मागील अनेक दिवसापासून सांडपाणी व मोठमोठे खड्डे असल्याने रस्ता बऱ्याच दिवसापासून बंद स्थितीत होता. कडेला असलेल्या काट्या, रस्त्यावर येणारे शहरातील सांडपाणी व गटारी यामुळे या परिसरात अस्वच्छता होती. यावलचे समाजसेवक नितीन सोनार यांनी सामाजीक बांधिलकीच्या माध्यमातूम पुढाकार घेत स्वखर्चाने सदर रस्त्यावर स्वच्छता अभियान राबवले.
याप्रसंगी यावलचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक देशपांडे, भगतसिंग देवनाथ पाटील, आदीवासी तडवी भिल एकता मंचचे प्रदेशाध्यक्ष एम बी तडवी, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ निलेश गडे, युवक राष्ट्रवादीचे हितेश गजरे, माजी नगरसेवक व प्रहारचे शहराध्यक्ष तुकाराम बारी, नरेंद्र शिंदे, कामराज घारू, कैलास माळी, पवन खर्चे, महेश महाजन, गोलू माळी, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड देवकांत पाटील व यावल परिसरातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी परिसरातील नागरीकांनी राबविण्यात आलेल्या स्वच्छता कार्याबद्दल आनंद व्यक्त केला.