कोरोनाने मृत झालेल्या पोलीस पाटलाच्या वारसांना मदतीचा धनादेश

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या वाघोदा बुद्रुक येथील पोलीस पाटील जगदीश देवराम पाटील यांचा कोरोनाने मृत्यू झाला असून आज त्यांच्या वारसांना पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याहस्ते ५० लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

मौजे वाघोदा बु येथील कर्तव्य दक्ष पोलीस पाटील जगदिश देवराम पाटील यांना कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करतांना कोरोनाची लागण झाली होती व ते औषधोपचारा दरम्यान मयत झाले होते. त्यांना कर्तव्यावर असतांना मयत झाल्यने शासनातर्फे ५० लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी आज दिनांक २४  रोजी सावदा पोलीस स्टेशन येथे मा पोलीस अधीक्षक   प्रविण मुंढे, यांनी मयताच्या वारस श्रीमती सुलभा जगदीश पाटील यांना ५० लाख रूपयाचा धनादेश देवुन केली.

सदर वेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जळगाव, प्रांताधिकारी  कैलास कडलग फैजपूर, सहा पो निरी डी डी इंगोले सावदा पोलीस स्टेशन, किशोर पाटील सामाजिक कार्यकर्ते वाघोदा बु हे उपस्थित होते.

 

Protected Content