जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवी पेठ परिसरात दिवाळीचा बाजार करण्यासाठी आलेल्या वृद्धेला मागून अज्ञात महिलेने धडक दिली. हातचालाकी करीत वृद्धेकडे असलेल्या पिशवीतून ४५ हजारांची रोकड लांबविले. ही घटना शनिवारी दुपारी नवीपेठेतील दाणा बाजार परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बळीराम पेठेत गिताबाई श्रावण चौधरी या वृद्ध महिला वास्तव्यास आहे. शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गिताबाई या त्यांच्याकडे असलेल्या कामवाली बाई रंजना प्रजापत यांच्यासोबत नावीपेठतील दाणाबाजार परिसरात दिवाळीचा बाजार करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी त्यांच्याकडे असलेली ४५ हजारांची रोकड कापडाच्या पिशवीत ठेवून ती पिशवी खांद्याला अडकवलेली होती. किरणा सामान घेण्यासाठी त्या दुकानात जात असतांना त्यांना एका अनोळखी महिलेने मागून धक्का दिला. यावेळी त्या महिलेने हातचालाखी करीत वृद्धेच्या खांद्याला असलेल्या पिशवीतून रोकड लांबवली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.