जावयाची अजब मागणी; सासूचा हात धरून म्हणाला…!

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बायकोला माझ्यासोबत आत्ताच पाठवा नाहीतर, तुम्ही चला अशी अर्वाच्य भाषा वापरून सासूचा विनयभंग केल्याचा प्रकार चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे या गावी घडला आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील तरूणाची सासुरवाडी चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे येथील आहे. कौटुबिक वाद असल्याने पत्नी ही माहेरी निघून गेली आहे. पत्नीला घेण्यासाठी पतीराजा हा सासुरवाडीला २४ सप्टेंबर रोजी गेला. पती घेण्यासाठी आला परंतू पत्नीने सोबत जाण्यास नकार दिला. त्यावेळी पत्नीची आई (सासू) देखील घरीच होती. यावर जावयाने सासूला उद्देशून बोलत “माझी बायको तुमच्याकडे आहे. तिला माझ्यासोबत आत्ताच पठवा, नाहीतर तुम्हीच माझ्यासोबत चला” अशी अर्वाच्य भाषा वापरून सासूचा हात पकडला व तिच्या अंगावरील साडी ओढली. तसेच शालकाचा पाहून घेईन अशी धमकी देत शिवीगाळ करून निघून गेला. यासंदर्भात सासूने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जावयावर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल पाटील करीत आहे.

 

Protected Content