जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इच्छादेवी चौकात झालेल्या भीषण अपघातात शिंदे नगरातील तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मे २०२५मध्ये घडली होती. या घटनेबाबत मंगळवारी २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम धिरज ठाकूर वय २३ रा. शिंदे नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिंदे नगरात राहणार प्रेम ठाकूर हा २६ मे २०२५ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईडी १२३४ ) ने जळगावकडे येत असतांना ईच्छादेवी चौकाजवळ मागून भरधाव वेगाने येणारा अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत प्रेम हा दुचाकीसह दुभाजकावर धडकला. त्यावेळी त्यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशी अंती अखेर मंगळवारी २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहे.




