Home क्राईम जिल्हा रुग्णालयात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

जिल्हा रुग्णालयात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

0
31

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील जिल्हा रुग्णालयात आलेल्या २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे..

जळगाव तालुक्यातील एका गावात तरुणी वास्तव्यास आहे. ती २७ ऑक्टोंबर रोजी जिल्हा रुग्णालयात अाली असता विजय ऊर्फ बबल्या दिलीप पाटील याने तरुणीसोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. तर दोन अनोळखी व्यक्तींनी तरुणीस शिवीगाळ करत दमदाटी केली. याप्रकरणी दहा दिवसानंतर तरुणीने सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यावरुन विजय पाटील याच्या दोन अनोळखी व्यक्ती अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक अलका शिंदे ह्या करीत आहेत.


Protected Content

Play sound