जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाटिकाआश्रम येथे झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याची घटना शनिवारी 31 ऑगस्ट रोजी 2 वाजता घडली होती. याप्रकरणी रात्री 11 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील वाटिकाआश्रम येथे भरधाव कारने अजबसिंग नारायण पाटील (वय 78 रा. द्वारका नगर, जळगाव) या वृद्धाला जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घडली. दोन दिवसांपूर्वी देखील याच पद्धतीने भरदार ट्रकने दोन महिलांना चिरडल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर येथील परिसरातील संतप्त नागरिकांनी दुपारी 2 वाजता राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढलेल्या जमाबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रात्री 10 वाजता पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण 30 ते 35 जणांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे.