यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातोद शिवारात अर्धवट कुजलेल्या मृतावस्थेत सापडलेल्या नऊ महिन्याच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाच्या वारसाचा शोध घेण्याकामी सदर बाळाचे मृतदेह जळगाव येथे शासकीय वैद्यकीय विद्यालयात डीएनए चाचणी व शवविच्छेदना साठी पाठविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील सातोद गावातील शिवारात मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला कुजलेल्या अवस्थेत अर्धवट मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यावेळी यावल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पचंनामा करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, मृतदेह जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला आहे.
तसेच बाळाच्या वारसाचा शोध घेण्याकामी एनएनए चाचणी व शवविच्छेदन बुधवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी करण्यात आले. याप्रकरणी सातोद गावाचे पोलीस पाटील चंदन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.विजय पाचपोळे व पोलीस हेड कॉन्सटेब्ल राजेन्द्र पवार हे करीत आहे.