जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद ते जळगाव रस्त्यावरील भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वराला जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती अखेर सोमवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता ट्रकवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश भास्कर ढाके वय-४५, रा. ज्ञानदेव नगर, जळगाव असे महेश झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, योगेश ढाके हा शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीपी ४६६०) वरून नशिराबाद गावाकडून जळगावकडे येत असताना चिरमाडे पेट्रोल पंपाजवळ समोरून चुकीच्या दिशेने येणारा माल ट्रक क्रमांक (एमएच १८ बीजी २९३७) ने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश ढाके हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला होता. दरम्यान अपघात घडल्यानंतर ट्रकचालक वाहन घेऊन पसार झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला होता. दरम्यान चौकशी अंती अखेर मयत योगेश ढाके यांच्या पत्नी रेखा ढाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन हे करीत आहे.