भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील बादशहा गॅरेज जवळ भरधाव बलकर टँकरच्या धडकेत रस्त्यावर पायी जाणारे वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी 26 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री 10 वाजता बलकर ट्रक चालकावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद कुमार चंद्रिका प्रसाद पांडे वय -, रा. शिवदत्त नगर भुसावळ असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोदकुमार पांडे हे आपल्या परिवारासह भुसावळ शहरातील शिवदत्त नगर परिसरात वास्तव्याला होते. शुक्रवारी 26 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील बादशहा गॅरेज जवळून ते पायी जात असताना मागून येणारा बलकर ट्रक क्रमांक (एमएच 20 इजी 7491) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी रात्री 10 वाजता मयत प्रमोदकुमार पांडे यांचा मुलगा संजय प्रमोदकुमार पांडे वय-26 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बलकर ट्रक चालक सुनील विनायक तायडे वय 49 रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव ता. भुसावळ याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद तायडे हे करीत आहे.