जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत राहणाऱ्या व्यापाऱ्याची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत गुरुवार १ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर मदनलाल कावणा (वय-३०) रा. सिंधी कॉलनी, कवर नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. व्यापाऱ्याचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर त्यांची मालकीची (एमएच १९ बीव्ही ६६४३) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. सर्वत्र शोध घेऊन दुचाकी मिळून न आल्याने अखेर आठ दिवसानंतर गुरुवार १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.