जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत ठार झालेल्या वृध्द महिलेच्या मृत्यू प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरसाळ-साकळी येथील निंबा चऱ्हाटे (७०) हे पत्नी प्रभाववती निंबा चऱ्हाटे (६५, रा. शिरसाळ-साकळी, ता. यावल) यांच्यासह २२ जून २०२३ रोजी दुचाकीवर जात असताना कानळदा ते विदगाव दरम्यान एका शेताजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली होती. त्यात प्रभावती चऱ्हाटे या खाली पडल्या व त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि नाकाला मार लागून त्या ठार झाल्या होत्या. या प्रकरणी निंबा चऱ्हाटे यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ९ ऑक्टोबर रोजी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि माणिक सपकाळे करीत आहेत.