जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इकबाल कॉलनी परिसरातून एका तरुणाची ३ लाख रुपये किमतीची चारचाकी वाहन चोरून नेल्याची घटना २४ मार्च रोजी सकाळी १० वाजता घडली होती. याची चौकशी अंती अखेर शनिवारी ८ जून रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की. सोहेल परवेज काजी वय-३१, रा. मलकापूर जि.बुलढाणा हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे, २४ मार्च रोजी सकाळी १० वाजता सोहेल हा एमएच ४९ बीके ५४५५) कारने जळगाव शहरातील इकबाल कॉलनी येथे आलेला होता. शेख रईस शेख सत्तार रा. अक्सा नगर, जळगाव याने ही कार चोरी केल्याचे समोर आले. ही घटना २४ मार्च रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले आहे. त्यानंतर त्यांनी कारचा शोध घेतला, अखेर ही शेख रईस शेख सत्तार यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. त्यानुसार सोहेल काझी याने शनिवारी ८ जून रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे.