पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जादा दराने बियाण्यांची विक्री करणार्या येथील गायत्री ॲग्रो एजन्सी या कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.
तालुक्यातील कृषी विक्रेते मे गायत्री ॲग्रो एजन्सी , पारोळा कापूस बियाणे जादा दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती दि. २६ मे रोजी कृषी विभागाच्या भरारी पथकास मिळाली होती. या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा भरारी पथकाने डमी ग्राहक म्हणून एक शेतकरी यांना मे. गायत्री ॲग्रो एजन्सीज विक्री वर पाठविले होते.
याप्रसंगी कृषी केंद्रावर त्यांना ८६४ रुपयास मिळणारे कापूस पिकाचे कबड्डी वाण बाराशे रुपये किमतीस शेतकर्यास विक्री करताना रंगे हात पकडले. सदर घटनेच्या आधारे दिनांक २७ मे रोजी पोलीस स्टेशन पारोळा येथे गुरनं.१६९/२०२४ अन्वये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईसाठी उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर सी. डी. साठे, विभागीय नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी पंचायत समिती पारोळा दिनेश कोते, कृषी सहायक रोहित शिंदे विस्तार अधिकारी संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.