जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात विनापरवाना हातात तलवार घेवून परिसरात दहशत माजवित असलेल्या तरूणाला रामानंद नगर पोलीसात ताब्यात घेतले असून तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हरीविठ्ठल नगरातील आत्महत्या कॉलनी परीसरात संशयित आरोपी अक्षय प्रकाश गवई (वय-२१) रा. कुसुंबा ता. जि. जळगाव ह.मु. हरीविठ्ठल नगर हा तरूण २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता हातात तलवार घेवून परिसरात दहशत माजवित असल्याची गोपनिय माहीती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार रामानंदनगर पोलीसांचे पथक रवाना झाले. पोलीसांनी संशयित आरोपी अक्षय गवई याला तलवारीसह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र भरत चौधरी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक शिरसाठ करीत आहे.