अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे फाट्याजवळ असलेल्या वीटभट्टीजवळून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर चालकावर कारवाई करतांना चालक ट्रक्टर घेवून पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ट्रक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाने फाट्याजवळ असलेल्या धनराज शेठ यांचे वीटभट्टी जवळ ट्रॅक्टर चालक सचिन उर्फ मुन्ना मराठे ( पूर्ण नाव माहित नाही) हा ट्रॅक्टर घेऊन गिरणानदी पात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करत असताना आढळून आला. याप्रकरणी मंडळाधिकारी किरण खंडू बाविस्कर (वय-४३) रा. आव्हाने ता. जिल्हा जळगाव यांनी १० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत असतांना ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

 

Protected Content