जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापूरा परिसरात राहणाऱ्या एका तरूणाने धार्मीक भावना दुखावणारी व दोन समाजा तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकून ती व्हायरल केल्याचा प्रकार १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, पवन हटकर (वय-४०) रा. तांबापूरा, जळगाव या तरूणाने रविवारी १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता इन्स्टाग्रामवर एका धर्माविषयी आक्षेपार्ह फोटो एडीट करून आक्षेपार्ह मजकूर लिहून ती सोशल मीडियावर व्हायरल करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एमआयडीसी पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार सायंकाळी १० वाजता संशयित आरोपी पवन हटकर याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक गिरासे करीत आहे.