आदर्शनगरात दुचाकीला कारची जोरदार धडक; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीने एअरपोर्ट येथे जाणाऱ्या दुचाकीधारकाला अज्ञात चार चाकी वाहनाने ओव्हरटेक करून जोरदार धडक दिली. यात दुचाकीधारक किरकोळ जखमी झाले आहे मात्री दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. 

अब्दुल कादीर नासीर हुसैन आरसीवाला (वय-३४) रा. आदर्श नगर, डीमार्ट जवळ हे आपल्या कुटुंबियासह राहतात. त्यांचे शालक यांना घेण्यासाठी एअरपोर्ट येथे दुचाकीने जाण्यासाठी अब्दुल कादीर हे दुपारी १ वाजता निघाले. शहरातील आदर्शनगरातील डीमार्टच्या मागील बाजूस असलेल्या रोडवरून जात असतांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत अब्दुल कादीर हे दुचाकीसह रोडाच्या बाजूला पडले. अपघात होताच कारचा चालक कार घेवून फरार झाला होता. अब्दुल कादीर यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे हे करीत आहे. 

 

Protected Content