नांद्रा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील नांद्रा -हडसन रस्ता दरम्यान पाचोराकडून येणाऱ्या कारने नांद्राकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी 4.15 वाजेच्या सुमारास घडली. मयताचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, स्विप्ट डिझायर क्रमांक एमएच 19 सीएफ 3848 ही जळगावकडून पाचोरा कडे जात असतांना नांद्रा आणि हडसन दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या दुतर्फाच्या विरूध्द मार्गने जात असतांना समोरून येणारी टीव्हीएस मोटारसायकल क्रमांक एमएम 19 बीआर 1166 ला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. यावेळी मयताच्या सोबत शरद श्यामराव पाटील रा. गाळण ता.पाचोरा या नावाची कागदपत्रे असल्याचे आढळून आले आहे. तर दुसरा नाना नावाचे व्यक्ती असून ते गंभीर जखमी झाले आहे. हे दोघे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागात कामाचे कोटेशन घेवून जात असल्याची माहिती गावातील नागरीकांनी सांगितले. ही घटना सायंकाळी 4.15 वाजच्या सुमारास घडली. ही घटना घडल्यानंतर कारमधील चालक आणि इतर जण पसार झाले.