Home क्राईम बुलढाण्यातील ‘डोनगाव’मध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट

बुलढाण्यातील ‘डोनगाव’मध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट

0
48

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा येथील ‘मेहकर’ तालुक्यात मुंबई – नागपूर महामार्गावरील ‘डोनगाव’ येथील एका वेल्डिंग दुकानातील गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

या दुर्घटनेत तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. वेल्डिंग दुकानातील गॅस सिलिंडरचा हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी झालेला स्फोट सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

 


Protected Content

Play sound