यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल रावेर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांचा भालोद येथे आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी आदिवासी कोळी समाजाच्या प्रलंबित जात वैधता प्रमाणपत्र व इतर विकास कामांसदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
आदिवासी कोळी समाजातर्फे जिल्हाध्यक्ष हरिलाल भाऊ कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बेटी बचाव अभियान जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत कोळी, माजी पं.स.सदस्य विश्वनाथ कोळी, सुभाष सपकाळे सर सुनोदा, योगेश्वर कोळी अध्यक्ष महाएकता फाउंडेशन तांदलवाडी, मनोहर भाऊ कोळी जिल्हा महासचिव आ. कोळी महासंघ रावेर, संदिप महाले निंभोरा, राहुल कोळी पुरी, गोपाळ कोळी सरपंच खिरवड, सागर कोळी भालोद, सुभाष सोनवणे, उमेश कोळी पातोंडी, धनराज सपकाळे उपसरपंच अंजाळे, केलास सपकाळे, अंजाळ ग्रामपंचायत सदस्य अशोक सपकाळे, राजेंद्र कोळी, भगवान कोळी, ईश्वर कोळी, आकाश कोळी, अनिल कोळी, नाना कोळी, प्रदिप कोळी भालोद सरपंच, जितु कोळी, बाळा कोळी, योगेश कोळी बोरावल, रविंद्र कोळी, समाधान कोळी, गोपाळ कोळी कठोरा, सुनील सोनवणे, रविंद्र सोनवणे दुसखेडा, भिमराव तायडे, विनायक सपकाळे कासवा यांच्यासह रावेर-यावल तालुक्यातील इतर गावातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.