शेतात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| अमळनेर तालुक्यातील झाडी गावातील नाना रामदास पाटील वय ५५ रा. झाडी ता. अमळनेर यांचा मृतदेह हाडांसह विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील झाडी गावात नाना पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. दरम्यान, झाडी शिवारातील त्यांच्या शेतात नाना पाटील यांचा मृतदेह हा हाडांसह विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना गुरूवारी ३० मे रोजी दुपारी १२ वाजता समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मारवड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मृतदेहाला कुत्रे किंवा अन्य प्राणी यांनी लचके तोडले असावे व त्यात त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेहाचा पंचनामा करून अमळनेर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन निकम हे करीत आहे.

Protected Content