अहमदनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अहमदनगर तालुक्यातील पांगरमल येथे चोर असल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. चांगदेव नामदेव चव्हाण असे मृत तरुणाचे नाव आहे. तो छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील पखोरा येथील रहिवासी आहे.
तो काही कामानिमित्त नगर तालुक्यातील पांगरमल येथे आला होता. तिथे त्याला चोर समजून जमावाने बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पांगरमल येथील 6 जणांविरोधात अहमदनगर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.