आईने कुत्र्याला मारल्यामुळे रागाच्या भरात १४ वर्षीय मुलाने जीवन संपवले

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | घरातील पाळीव कुत्र्याला आईने मारले म्हणून रागाच्या भरामध्ये 14 वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. घरात घाण केल्याने आईने पाळीव कुत्र्याला मारले, याचा राग मनात ठेवून 14 वर्षीय राजवीर राहुल गडकरने थेट स्वतःचे आयुष्यच संपवले आहे. राजवीरने गळफास घेऊन आत्महत्या केली.

छत्रपती संभाजीनगर शहरातील मिल कॉर्नर भागातील ही धक्कादायक घटना आहे. राहुलने काही दिवसांपूर्वी पाळण्यासाठी एक कुत्रा घरामध्ये आणला होता. पाळलेल्या कुत्र्याने घरात घाण केली म्हणून त्याच्या आईने कुत्र्याला मारले. तसेच घराबाहेर मित्रांसोबत बसलेल्या राजवीरवरही आई रागावली. याचा राग मनात ठेवून राजवीरने बेडरूममध्ये जाऊन गळफास घेतला. थोड्या वेळाने आई आणि शेजाऱ्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी राजवीरचा गळफास काढून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी राजवीरला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Protected Content