भुसावळ प्रतिनिधी । भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नॉन-कोविड रूग्णांवर उपचार करण्यात येणार असून आज याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये सध्या करोना संक्रमित रुग्ण आहेत.मागील आठवड्यापासून त्यांची संख्या पण ४ ते १० च्या आतच आहे. ट्रौमा केअर सेंटरची पूर्ण वास्तू फक्त करोना चाचणीसाठी (आरटीपीसीआर) वापरण्यात येत आहे. येथे मागील १५ दिवसांमध्ये दररोज फक्त ५ ते १५ असेच रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. या रुग्णांसाठी संपूर्ण ट्रॉमा केअर सेंटरची बिल्डिंग अडकवणे निश्चितच संयुक्तिक नाही. संबंधीत तपासणी ही ग्रामीण रूग्णालया मध्ये सुद्धा करता येण्यासारखी आहे.
यामुळे जे इतर कोविड सोडून आजारी रुग्ण आहेत त्यांची यामुळे होणारी गैरसोय थाबेल.त्यांना ट्रॉमा केअर सेंटर मधेच उपचार मिळतील. आणि त्यांच्या पुढे जाण्याचा शाररीक त्रास आणि आर्थिक त्रास पण वाचेल.शिवाय आरोपी,जेल मधील कैदी यासाठी पोलिसांना शिरसोली रोड वरील रुग्णालयात जाण्याचा पण त्रास आणि वेळ वाचेल.
या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि.तु. पाटील यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन.जी. चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याकडे मागणी केली होती. यात त्यांनी म्हटले होते की, भुसावळ मधील ग्रामीण रुग्णालयात सर्व करोना रुग्णासाठी चाचणी,तपासणी,भरती करावी. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये इतर रुग्णासाठी उपचाराची सोय करावी आणि जनतेच आणि पोलिसांचा त्रास वाचवावा. या अनुषंगाने आज जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. जी. चव्हाण यांनी लेखी आदेश काढले.यानुसार
१) भुसावळच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नॉन-कोविड रूग्णांना सुविधा देण्यात यावी.
२. ग्रामीण रुग्णालय भुसावळ येथे कॉविड १९ संशयित आणि संक्रमित रुग्णांना सेवा देण्यात यावी.
३. रेल्वे हॉस्पिटल भुसावळ येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल हे तात्पुरते स्वरुपात बंद करून सर्व रुग्णांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे. रुग्ण संख्या वाढली तर परत केंद्र सुरु करण्यात येईल.
या आदेशामुळे ग्रामीण भागातील रुग्ण आणि पोलिस बांधवांचे होणारे त्रास वाचणार आहेत.त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळणार आहे.भाजप भाजप वैद्यकीय आघाडीचा हा यशस्वी पाठपुरावा असल्याची प्रतिक्रिया डॉ. नि.तु. पाटील यांनी व्यक्त केली आहे.