आ. चौधरी यांची रोजगार हमी योजना व अनुसूचित जमाती कल्याण समिती सदस्यपदी वर्णी

 

फ़ैजपूर, प्रतिनिधी । विधानसभेचे अध्यक्ष ना. नाना पटोले यांनी मंगळावर दि.३ नोव्हेंबर रोजी सन-२०२०-२१ वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर विधानसभा सदस्यांची नियुक्ती जाहीर केली. यात आ.शिरीष मधुकरराव चौधरी यांची रोजगार हमी योजना व अनुसूचित जमाती कल्याण समिती सदस्यपदी वर्णी लागली आहे.

विधानसभेचे अध्यक्ष ना. नाना पटोले यांनी विधानमंडळाच्या समित्यांमध्ये रावेर विधानसभेचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांची विधानसभा नियम-२४१ अन्वये “रोजगार हमी योजना समिती” व विधानसभा नियम-२३५ अन्वये “अनुसूचित जमाती कल्याण समिती’ या महत्वाच्या दोन समित्यांवर नियुक्ती केली आहे. या नियुक्त्या विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या असून जिल्हा कॉंग्रेस कमिटी,जळगाव व रावेर विधानसभा महाआघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ.शिरीषदादा चौधरी यांचे अभिनंदन केले.

Protected Content