Home Uncategorized ३ वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये अडकला

३ वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये अडकला


निवारी, (मध्य प्रदेश) : वृत्तसंस्था । मध्य प्रदेशातील टिकामगढ जिल्ह्यातील निवारी तालुक्यात एक चिमुरडा बोअरवेलमध्ये अडकला आहे तीन वर्षांचा हा मुलगा खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला. सहायक पोलीस अधीक्षक प्रतिभा त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीत, हा चिमुरडा सेतपुरा गावचा रहिवासी आहे

मुलाला वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच सेनेचीही मदत घेण्यात आलीय. सेनेनं घटनास्थळी दाखल होत मुलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुलगा सुखरुप बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केलाय. ‘ओरछाच्या सेतपुरा गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या लहानग्या प्रल्हादला वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत सेनाही बचावकार्यात सहभागी झालीय. ईश्वर मुलाला दीर्घायुष्य प्रदान करो, आपण सगळेच यासाठी प्रार्थना करू’ असं ट्विट मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलंय.


Previous articleजो बायडन यांची निर्णायक आघाडी
Next articleधनगर की धनगड ?; सोक्षमोक्ष लावा
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound