भडगावः प्रतिनिधी । तालुक्यातील कजगाव येथे २ सट्टा अंड्यांवर धाडी टाकून पोलिसांनी ६ आरोपी पकडले . नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली .
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांनी परीक्षेत्रातील अवैध धंदे समूळ उच्चटन करण्यासाठी नेमलेल्या पथकाने कजगाव येथे दुपारी सावतामाळी चौक, नवे कजगाव, प्रसाद मेन्स पार्लर शेजारी एका बंद दुकानाचे आडोश्याला सट्टा जुगाराच्या अड्यावर छापा टाकला ४ आरोपी कल्याण नावाचा सट्टा खेळतांना व खेळवितांना पकडले गेले त्यांचे कडुन रुपये २९ हजार ९२० रोख व १५ हजार किमतीची मोटार सायकल आणि जुगाराची साधने जप्त करण्यात आली .
त्यानंतर सावतामाळी चौकात सन्स स्क्रीन प्रिंटींग प्रेस व रॉयल फोटो स्टुडीओ या दुकाना समोर एका बंद टपरीच्या आडोश्याला सट्टा जुगाराच्या अड्यावर छापा टाकला तेथे ०२ आरोपी कल्याण नावाचा सट्टा खेळतांना व खेळवितांना पकडले गेले त्यांचे कडुन १ ३हजार ७५० रुपये व जुगाराची साधने जप्त करण्यात आली .
या दोन्ही धाडींची फिर्याद भडगाव पोलीस ठाणे येथे पो कॉ विश्वेश्वर हजारे ( दोंडाईचा) , व पो. कॉ दीपक ठाकूर (धुळे) यांनी दाखल केल्यानंतर २ गुन्हे नोंदविण्यात आले.
अनिल महाजन ( रा. कजगाव), नाना भिल, (रा. हिंगोणे) , भोजराज चव्हाण ( रा. स्वामी समर्थ नगर, कजगाव) , नामदेव पाटील (रा. कजगाव), रविंद्र पाटील (पातोंडा, ता. चाळीसगाव), अशोक भिल्ल, संतोष पाटील या आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलीस नाईक नितीन सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल विश्वेश हजारे, दीपक ठाकूर, अमोल भामरे यांनी केली.