तिरपोळे येथे विवाहितेने गळफास घेऊन केली आत्महत्या

चाळीसगाव, प्रतिनिधी  । तालुक्यातील तिरपोळे येथील ३८ वर्षीय विवाहित महिलेने  आपल्या राहत्या घरातील पंख्याला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील तिरपोळे येथील  शिमा मंगलसिंग सुर्यवंशी (वय- ३८ रा. तिरपोळे ता. चाळीसगाव) या विवाहित महिलेने  आपल्या राहत्या घरातील पंख्याला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून सुनेरसिंग रूपसिंग सुर्यवंशी (रा. तिरपोळे) यांच्या खबरीवरून मेहूनबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुभाष पाटील हे करीत आहेत.

Protected Content