Home Cities जळगाव खडसे एकटे म्हणजे सारा ओबीसी समुदाय नव्हे

खडसे एकटे म्हणजे सारा ओबीसी समुदाय नव्हे

0
46


मुंबई : वृत्तसंस्था । एकनाथ खडसें यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. ओबीसी म्हणजे एकनाथ खडसे नाहीत असंही ते म्हणाले आहेत.

सतत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या एकनाथ खडसेंविरोधात भाजपा आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी जेवढं काम केलं तेवढं कोणीही केलं नाही. फडणवीस सरकारने अनेक प्रश्न मार्गी लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील ओबीसी समाजातूनच येतात पण आम्ही उल्लेख करत नाही. भाजपाला टार्गेट केलं जात असल्याने आम्हाला तो उल्लेख करावा लागतो,” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.


Protected Content

Play sound