Home धर्म-समाज एप्रिलपासून गॅसच्या किमती १८ टक्क्यांनी वाढणार !

एप्रिलपासून गॅसच्या किमती १८ टक्क्यांनी वाढणार !


 

 

41 gas

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) १ एप्रिलपासून आपलं घरगुती बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. कारण सरकार घरगुती नैसर्गिक गॅसच्या किमती १८ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. नवे दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. नव्या ‘घरगुती गॅस धोरण २०१४’ अंतर्गत दर सहा महिन्यांनी नैसर्गिक गॅसच्या किमती ठरवल्या जातात.

 

हा फॉर्म्युला परदेशी बाजारातल्या किमतीवर आधारित असतो. सरकारच्या या निर्णयामुळे वाहनांमध्ये इंधनाच्या स्वरूपात वापरण्यात येणारा सीएनजी आणि घरगुती जेवण बनवण्यासाठी वापरात येणाऱ्या पीएनजी गॅसच्या किमती वाढणार आहेत. यामुळे सामान्य माणसाच्या खिशावर त्याचा अतिरिक्त भार पडणार आहे.
रेटिंग एजन्सी केअर रिपोर्टनुसार, घरगुती नैसर्गिक गॅसच्या किमती १८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मॅन्युफॅक्चरिंग, ट्रॅव्हल आणि एनर्जी सेक्टरमध्ये महागाई वाढू शकते. भारतातल्या नैसर्गिक गॅसच्या किमती या गॅस वितरक देश असलेल्या अमेरिका, रशिया आणि कॅनडा यांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींनुसार ठरतात. एप्रिल-सप्टेंबर २०१९ च्या तिमाहीमध्ये नैसर्गिक गॅसच्या किमती ३.३६ डॉलरवरून वाढून ३.९७ डॉलर होण्याची शक्यता आहे. अशातच कंपन्याही देशातले दर वाढवू शकतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound