Home Cities जळगाव पदभार स्वीकारण्यापूर्वी आयुक्त टेकाळे अडकले लिफ्टमध्ये

पदभार स्वीकारण्यापूर्वी आयुक्त टेकाळे अडकले लिफ्टमध्ये


13 06 2017 lift

जळगाव (प्रतिनिधी) आयुक्‍त उदय टेकाळे हे आज पदभार घेण्यासाठी आल्याबरोबर त्यांना महापालिकेतील भोंगळ कारभाराला सामोरे जावे लागले. आयुक्त टेकाळे हे लिफ्टमधून जात असताना चौथ्या मजल्यावरच लिफ्ट बंद पडल्यामुळे ते अडकले. थोड्यावेळानंतर लिफ्ट सुरु झाल्यावर त्यांनी दालनात जावून मावळते आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडून पदभार स्विकारला.

 

महापालिकेचे आयुक्‍त चंद्रकांत डांगे यांच्या जागेवर डॉ. उदय टेकाळे यांची पंधरा दिवसांपुर्वी नियुक्‍ती करण्यात आली होती. परंतू, आजारपणामुळे टेकाळे येवू शकले नव्हते. आज शुक्रवारी महापालिकेच्या आयुक्‍त पदाचा पदभार घेण्यासाठी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आले. परंतु आयुक्‍तांचे दालन महापालिका इमारतीच्या तेराव्या मजल्यावर असल्याने दालनात जाण्यासाठी आयुक्त टेकाळे हे पहिल्या मजल्यावरून लिफ्टमध्ये बसले. मात्र लिफ्ट चौथ्या मजल्यापर्यंत गेल्यानंतर अचानक बंद पडल्याने नवीन ते अडकले. टेकाळे हे साधारण तीन- चार मिनिट लिफ्टमध्येच अडकले होते. यानंतर लिफ्टचा दरवाजा उघडल्यावर आयुक्‍त टेकाळे हे बाहेर आले. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound