Home Cities जळगाव सुधर्माच्या वर्धापन दिनी कचरा वेचणार्‍या महिलांचा सन्मान

सुधर्माच्या वर्धापन दिनी कचरा वेचणार्‍या महिलांचा सन्मान

0
49

जळगाव प्रतिनिधी । सुधर्मा संस्थेतर्फे वर्धापनदिनाचे औचित्य साधून शहरातील १५ कचरावेचक महिलांचा गौरव करण्यात आला.

सुधर्मा संस्थेचा अठरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी तांबापुरा भागातील १५ कचरावेचक महिलांचा सन्मान करण्यात आला. या महिलांना एक हजार रूपयांचा किराणा, साडी व मिठाई देण्यात आली. याप्रसंगी आशा बोरसे, मीरा मोरे, लिला मोरे, लिला वरवडे, गीता मगरे, केशर मोरे, कौशल्या ठाकरे, यशोदा लोंढे, सुमन लोंढे, वर्षा खलसे, अहिल्याबाई लोंढे, अंजनाबाई रणसिंग, नंदा रणसिंगे, मीनाबाई, निर्मला मोरे, हिराबाई लोंढे यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला हेमंत बेलसरे, सुनीता बेलसरे यांच्यासह प्रवीण पुराणिक, योगेश पाठक, अमोल पिंगळे यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound